MP Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमधून खासदार इम्तियाज जलील पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; ओवेसींची अधिकृत घोषणा

MP Imtiaz Jaleel : मागील काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील  यांच्या उमेदवारीविषयी चर्चा होत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांनी छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई या मतदारसंघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी देखील दाखवली होती. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'कडून खासदार इम्तियाज जलील लढणार आहेत. संभाजीनगरमधून लोकसभेसाठी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी एमआयएम पक्षाकडून निश्चित केली गेली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली गेली आहे.

Lok Sabha Election : "ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण..."; अजित पवारांबद्दल CM शिंदे-शिवतारेंमध्ये चर्चा

काही दिवसांअगोदर खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली  होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. खासदार इम्तियाज जलील आता पुन्हा एकदा संभाजीनगरमधूनच लढणार आहेत. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील  यांनी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. त्यामुळे मागील लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच एमआयएम'चा उमेदवार निवडून आला होता. आता पुन्हा एकदा एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. एमआयएम पक्ष लोकसभेच्या ६ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय.

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी एमआयएमकडूम खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसह तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

यामध्ये हैदराबादमधून ते स्वत: (असदुद्दीन ओवेसी)  निवडणूक लढवणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आणि बिहारच्या किशनगंजमधून अख्तरुल इमाम यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply