Moscow Attack : मॉस्को हल्ल्यामागे या देशाचा हात; पैसा, शस्त्रं कुठून आली? पुतीन यांनी दिली चेतावनी

Moscow Attack : जगातील सर्वात प्रसिद्ध कॉन्सर्ट हॉलपैकी एक असलेल्या मास्कोतील क्रोकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी रात्री 5 सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात आतापर्यंत १४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. १४५ हून अधिक लोक जखमी असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा दावा रशियन तपास यंत्रणांनी केला आहे. या सर्व दहशतवाद्यांना युक्रेन स्पेशल सर्व्हिसमध्ये बसलेल्या हँडलरकडून हाताळले जात असल्याचा आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या हल्ल्यामागे असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

हल्ला केल्यानंतर दहशतवादी जमावाच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, रशियन पोलीस दलाने काही तासांतच त्याला अटक केली. ब्रायन्स्क भागात रशियन सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला आणि नंतर कारमधून खाली उतरून जंगलात पळ काढला. रशियामध्ये याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत पण हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे.

Kanhaiya Kumar : कन्हैयाकुमार यांचे तिकीट कट

पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडले पण ३ जंगलात पळून गेले. फरार झालेल्या दहशतवाद्याचा शोध अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून अनेक ताजिकिस्तानचे पासपोर्ट, पिस्तूल आणि एके 47 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांनी या बंदुकांनी हल्ला केल्याचेही सांगण्यात आले.

रशियाची तपास यंत्रणा या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत. सर्व दहशतवाद्यांना करारावर बोलावण्यात आले होते. हे सर्व एकाच ठिकाणाहून आले नाहीत तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. या सर्व दहशतवाद्यांना युक्रेन स्पेशल सर्व्हिसमध्ये बसलेल्या हँडलरकडून हाताळले जात होते. मात्र ते कोणत्याही रशियन बंडखोर गटाचा भाग नाहीत.

चौकशीदरम्यान, त्याला लोकांना मारण्यासाठी 500 हजार रूबलची ऑफर देण्यात आली होती. भारतीय रुपयांमध्ये 4.50 लाखांपेक्षा जास्त. हल्ला करण्यापूर्वी निम्मी रकम आधीच दहशतवाद्यांना देण्यात आला होता, आल्याची माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply