MNS Vardhapan Din : मनसेचा आज १८ वा वर्धापनदिन, राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार; लोकसभेचं रणशिंग फुंकणार?

MNS Vardhapan Din : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यंदा प्रथमच मनसेकडून वर्धापन दिन मुंबईबाहेर साजरा केला जाणार आहे. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. 

राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून जवळपास ५ हजार मनसैनिक तसेच पदाधिकारी दादासाहेब गायकवाड सभागृहात बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील वाटचाल आणि दिशा याबाबत राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? याचा फैसला देखील आज होणार आहे. २०१४ पासून मनसेचा कायमच स्वबळावर लढण्याचा प्रयत्न राहिला आहे. मधल्या काळात राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. 

त्यामुळे आज राज ठाकरे महायुतीत सामील होण्याबाबत काय निर्णय घेणार? याकडे देखील मनसैनिकांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरात शुक्रवारी (ता. ८) त्यांनी मनसैनिकांसह आरती केली.

यावेळी मनसैनिकांनी जय श्रीराम असा नारा दिला. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हिंदुत्वाच कार्ड बळकट करण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर हिंदू जननायक प्रतिमा अधिक प्रखर करण्याचाही मनसेचा प्रयत्न असेल. दरम्यान, राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करताना नेमकी कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply