MLAs disqualification Verdict: 'शिवसेना शिंदेंची'; नार्वेकर यांनी दिला ठाकरे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्र- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. निकाल देताना नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्याच्या निकाल वाचनातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहुया...

नार्वेकरांच्या निकालातील महत्त्वाचे मद्दे-

१. ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.

२. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे

३. २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे.

४. २१ आणि २३ जून २०२२ शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहे. या दिवशी शिंदे गट हाच खरी शिवसेना.

५. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे.त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते

६. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे. एकनाथ शिंदे यांचे गटनेते पदी नियुक्तीही वैध

७. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे

८. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणत्याही नेत्याच्या हकालपट्टीचा अधिकार नाही

९. शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये १९मधील १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत.

१०. २३ जानेवारी २०१८ रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply