
पुणे : पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य दरडप्रवण, भूस्खलन होणाऱ्या अतिसंवेदनशील गावांची प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार धोक्याच्या ठिकाणावरील स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होत राहिल्यास कमी धोका असणाऱ्या गावातील नागरिकांचे देखील तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची दहा पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात माळीण येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत मदत व पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य धोका असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तत्पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या विभागामार्फत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ गावांना पावसाळय़ामध्ये धोका निर्माण होईल अशी शक्यता सर्वेक्षणाअंती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये संभाव्य धोका असणाऱ्या गावांमधील सुरक्षिततेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेश दिले आहेत. हवामान विभागाने यंदाही सरासरीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांतील पाऊस पाहता प्रथम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दहा तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय एका तुकडीत ५०० प्रशिक्षित अधिकारी, जवान, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गावांची पाहणी करून त्या गावात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांना संबंधित गावांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सलग तीन दिवस संततधार पाऊस झाल्यास तत्काळ स्थानिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांमधील धोकादायक गावांमध्ये स्वतंत्र तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. या तुकडय़ांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करम्ण्यात आला असून तुकडय़ांमधील संपर्क प्रमुखाने २४ तास संपर्कात रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तुकडय़ा तैनात करम्ण्यात आल्या असून प्रशासनातील सर्व विभागांना सूचना करण्यात आल्या असल्या, तरी स्थानिक पातळीवरील माहिती प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी किंवा प्रशासकीय व्यक्ती घटनास्थळी पोचण्यापर्यंत कालावधी लागत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांनी परस्पर संपर्कात रहावे. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रालगत असणाऱ्या गावांनी आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे. त्यांचे सहकार्य लाभल्यास शासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

