MI vs DC,Match Details : मुंबईचं विजयाचं खातं उघडणार? MI vs DC सामन्यात कोणाचं पारडं जड?

MI vs DC,Match Details : आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून आपली गाडी रुळावर आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यासह सर्वांचं लक्ष सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. कारण गेली काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान कसा राहिलाय मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड रेकॉर्ड..

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स  या दोन्ही संघांना या स्पर्धेत सुर गवसलेला नाही. एकीकडे मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला ४ पैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहिला तर, दोन्ही संघ ३३ वेळेस आमने सामने आले आहेत.

IPL 2024: डी-कॉक-पूरनचं आक्रमण अन् मयंक यादवचा वेग, लखनऊने RCB ला घरच्याच मैदानात केलं चीतपट

यादरम्यान मुंबई इंडियन्सने ३३ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला १५ सामने जिंकता आले आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघाचा या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ ८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने ५ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला ३ सामने जिंकता आले आहेत.
 

कशी असेल खेळपट्टी?

वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडतोच. बाऊंड्रीलाईन छोटी असल्याने इथे चौकार - षटकारांचा पाऊस पडतो. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर ११२ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ६२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा सहज पाठलाग केला जाऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियंस: इशान किशन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार),टीम डेविड, गेराल्ड कोएत्जी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

इम्पॅक्ट प्लेअर- डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, रोमारियो शेफर्ड, नेहाल वढेरा, शम्स मुलानी.

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, रिषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद

इम्पॅक्ट प्लेअर- अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रसिख दार सलाम, ललित यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply