Maval : सेल्फीने केला घात! मैत्रिणीला वाचवायला मित्र धावला, दोघेही बुडाले; कुंडमळा येथे तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Maval : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जाऊन तरुण- तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मावळ परिसरात घडली. मावळातील कुंडमळा येथील धबधब्याबर ही दुर्दैवी घटना घडली. तब्बल १२ तासांनंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मावळातील कुंडमळा धबधब्यातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिंचवड येथील सहा मुले आणि दोन मुली गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास येथे वर्षाविहारासाठी आले होते. त्यातील रोहन ज्ञानेशवर ढोंबरे, आणि श्रेया सुरेश गावडे हे दोघे सेल्फी काढण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. आधी श्रेया गावडे ही तरुणी पाय घसरुन पडली, त्यानंतर तिला वाचवायला रोहन ठोंबरे हा तरुण धावला अन् तो सुद्धा पाण्यात बुडाला.

Dagadusheth Ganpati : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे ‘स्त्री शक्ती’चा जागर

या घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या बचाव पथकांच्या अथक प्रयत्नानंतर रोहन ठोंबरे याचा मृतदेह सहा तासानंतर रेस्कु टीमच्या हाती लागला, मात्र श्रेया गावडे या मुलीचा शोध इंद्रायणी नदीच्या पात्रात सुरू होता. त्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर श्रेया गावडेहीचा मृतदेह आज सापडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply