Maratha Reservation : जरांगे पाटील यांचा वाघोलीत मुक्काम, तयारी सुरू

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई येथे जाण्यासाठी उद्या आंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. पुणे मार्ग ते मुंबई कडे जाणार आहेत. मंगळवारी  ( दि. 23 ) ते वाघोलीत मुक्काम करून पुढे रवाना होणार आहेत. त्यांच्या व बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची तयारी वाघोली खराडी परिसरातील मराठा बांधवांनी सुरू केली आहे.

मुक्कामाच्या तयारीबाबत मराठा बांधवांची नुकतीच बैठक झाली. वाघोली, खराडी, चंदननगर, आव्हाळवाडी, लोहगाव, परिसरातील मराठा बांधव व महिला उपस्थित होत्या. चोखीधानी रोड वरील आर के ग्रुपच्या मोकळ्या मैदानात त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे.

BuldhanaNews : अटक बेकायदेशीर... 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर

जरांगे पाटील यांच्या सोबत किती कार्यकर्ते असतील याचा कोणताही अंदाज अजून आयोजकांना आलेला नाही. हजारो कार्यकर्ते ग्रहीत धरून तयारी सुरू आहे. बैठकीत भोजन, निवास, पाणी, चहा-नाष्टा व अन्य बाबींच्या नियोजना संदर्भात चर्चा झाली. चार दिवसात मैदानाची स्वच्छता व इतर तयारी करण्यात येणार आहे.

प्रत्येक घरातून 10 भाकरी

जरांगे पाटील यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी या परिसरातील जे इच्छुक कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाकडून 10 भाकरी बनवून घेतल्या जाणार आहेत. तर भाजीची व्यवस्था संयोजक करणार आहेत. दुसऱ्या दिवसाच्या न्याहरीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply