Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ५०० ट्रॅक्टर्सची भव्य रॅली; ४२ आंदोलकांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे २ दिवस उरलेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांकडून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. अशातच बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 42 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लक्षवेधी लढा उभारला असून राज्यभर त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या या सभांना मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय.

Follow us -

Ahmednagar News : संगमनेर शहरात बिबट्याचा पाच तास मुक्त संचार; शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ १३ डिसेंबरला ५०० ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या ४२ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 143 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply