Maratha Reservation : 'हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या हालचाली?', जरांगे पाटील म्हणाले...

Maratha Reservation : मराठा समाजाला पुन्हा एकदा स्वतंत्र आरक्षण देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. हिवाळी अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेऊन तसं आरक्षण देण्यात येवू शकतं, असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचरण्याता आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे हे मुंबईत दाखल झाले आहेत. आंतरवाली सराटी इथं झालेल्या हल्ल्यावेळच्या तीन आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, आंतरवालीत आमच्यावर हल्ला झाला होता त्यामुळे आमच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणात सरकारचा काहीतरी डाव आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

2008 Mumbai Attacks : २६/११ हल्ल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण; अद्यापही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नाही?

दुसरीकडे अजित पवार यांनी वाचाळवीरांची संख्या वाढलीय असं म्हणत द्वेष निर्माण होईल, अशी विधानं कुणीही करु नयेत, असं आवाहन केलं होतं. त्यावर जरांगे म्हणाले की, अजित पवारांनी त्यांच्याच माणसाला समज देण्याची गरज आहे. त्यांची माणसं थांबायचं नावच घेत नाहीत, त्याला काय करणार? आम्ही आमच्या बाजूने कंट्रोल केलं आहे.

मराठा समाजाला हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं, असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्हाला वेगळं आरक्षण नकोय. जे मागे झालं तेच पुन्हा होईल. न टिकणारं आरक्षण नको असून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply