Kunbi Records: कुणबी नोंदी तपासण्यासाठी १३ मोडी लिपी अभ्यासकांची टीम तयार; प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणबी नोंदी तपासण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. आतापर्यंत ३७ लाख प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी २१ हजार नोंदी या कुणबीच्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

सर्वाधिक नोंदी या मोडी लिपीत असून या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ मोडी लिपी अभ्यासकांची टीम तयार केली आहे. व्हिसीद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करणार आहेत.
 
राज्य शासनाच्या सूचनेनुसार, जिल्हा प्रशासन कुणबीच्या नोंदी तपासत आहे. आतापर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय,वक्फ कार्यालय, महसूल नोंदी,नगरपालिका प्रशासन,महापालिका,शिक्षण तसेच जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील ३७ लाख ३ हजार ९७९ नोंदी तपासल्या आहेत.

या पैकी २१ लाख २८ हजार २६० नोंदी या १९४८ ते १९६७ कालावधीतील आहेत. यातील २१ लाखपैकी केवळ १ हजार ७८ नोंदी या कुणबीच्या आढळल्या आहेत. तसेच १५ लाख ७५ हजार नोंदी या १९४८ पूर्वीच्या आहेत.

यापैकी १९ हजार ९२९ नोंदी या कुणबीच्या आढळल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

कुणबींच्या सर्वाधिक नोंदी विदर्भात

राज्यात आतापर्यंत कुणबींच्या २९ लाख १ हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. यातील सर्वात जास्त नोंदी या विदर्भात सापडल्यात. विदर्भामध्ये १३ लाख ३ हजार ८८५ नोंदी सापडल्या आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ७९२ नोंदींचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply