सातारा : मनोज जरांगे पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे.
छगन भुजबळ माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही : मनोज जरांगे
यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे .मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा भुजबळांनी अपमान केला आहे. हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू .आपल्यात झुंज लावून राजकिय फायदा घेतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्ला केला. "कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?" असं म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले.
शहर
- Vashi Bridge : वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट! मुंबईला जोडणारा Vashi Bridge लवकरच होणार खुला
- Mumbai : वांद्रे रेल्वे स्थानक – वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक वातानुकूलित बस सेवा सुरू
- Pimpri : महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी, शहराच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकदाही मंत्रिपद नाही
- Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
महाराष्ट्र
- Maharashtra : “आम्हाला दोन महिन्यात मंत्रिपद गमावण्याची भीती”, आमदारांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत स्पष्ट बोलले
- Supriya Sule : “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस तोडलं; मोठा निर्णय घेत आमदारानं दिला राजीनामा
- Maharashtra Cabinet Expansion 2024 : उदय सामंत ते भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
गुन्हा
- Pune Crime : प्लॅट फॉर्म २ वर बॉम्ब, पुणे स्टेशन उडवणार, दारूच्या नशेत पुणे पोलिसांना फोन
- Pune : सिंहगड रस्ता भागात वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार, गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद; तीन अल्पवयीन ताब्यात
- Pune Crime : खळबळजनक! हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Chrystia Freeland : कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांचा राजीनामा; पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यावर गंभीर आरोप
- Cyclone Chido : फ्रान्सच्या किनाऱ्यावर ‘चिडो’ चक्रीवादळ धडकलं; हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती!
- Supreme Court : मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? निवडणूक आयोगला कोर्टाचा सवाल
- Kolkata : बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती