
Maratha Reservation : समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रईस शेख यांच्या कार्यकाळास चार वर्ष पूर्ण झाल्यानं भिवंडीत समाजवादी पक्षाच्या परिवर्तन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. या सभेसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी हे उपस्थित होते. या सभेत बोलताना अबू आझमींनी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली, मात्र समाजवादी पक्षाला टाळलं, त्यांना भीती आहे आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढू, असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
सकल मराठा आंदोलन करणाऱ्यांनी आपली ताकद दाखवली, त्यामुळे सरकार त्यांच्या पायाशी गेलं. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व पक्षीय सभा झाली, ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांना आमंत्रण दिलं फक्त समाजवादी पक्षाला डावललं. आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडू याची भीती सर्व राजकीय पक्षांना वाटली होती. सरकार मराठा आंदोलकांना रात्री उशिरापर्यंत आंदोलन करायला परवानगी देतं. आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी सहा नोव्हेंबर रोजी मुंबईत सायकल मोर्चा काढणार आहोत, त्याला पोलीस आडकाठी करत आहेत. पण आम्ही आंदोलनावर ठाम असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा देत मुस्लिम आपली मक्तेदारी असल्याचा दावा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी काहीही केलं नाही, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.
|
|
काश्मीर फाईल्स हा चित्रपट बोगस असून माहिती अधिकारात काश्मीरमध्ये मागील तीस वर्षात हत्या झालेल्यांची संख्या 1730 आहे. त्यापैकी फक्त 79 काश्मिरी पंडित होते. तरी सरकार फक्त काश्मिरी पंडितांसाठी रडत बसली आहे. हिंदू मुस्लिम या एकतेमध्ये फूट टाकण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशात अराजकता मजवणारे या देशाला इस्लामिक राष्ट्र करण्याची भाषा करत होते. म्हणून त्यांच्यावर बंदी घातली. हा देश सेक्युलर आहे. हा देश हिंदू मुस्लिम यांचा आहे. पण या देशाला हिंदू राष्ट्र बनवणार अशा गर्जना करणाऱ्या भाजप आरएसएसवर कोणतीही बंदी नाही, असा आक्षेप अबू आझमी यांनी नोंदवला आहे.
आबू आझमींचं मुख्यमंत्र्यांना नाराजी व्यक्त करणारं पत्र
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्ष नेत्यांच्या बैठकीत समाजवादी पक्षाला आमंत्रण न दिल्यामुळे आमदार अबू आजमी यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मराठा समजाला आधीही आम्ही पाठिंबा दिला होता, त्यांच्यासोबत मुस्लिमांनाही आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय 32 नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये अबू आझमी यांना बोलावण्यात आलं नव्हतं.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

