Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात कलम १४४ लागू

Maratha Reservation :आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला राज्यातील काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून १४४ कलम लागू केले जात आहे. बीड, नांदेड नंतर आता यवतमाळ जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षणासाठी २७ ठिकाणी साखळी उपोषण तर २० पेक्षा अधिक गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.  

Nandurbar News : बेमुदत उपोषणाला बसलेल्या ६५ वर्षीय गुलाब मराठेंचे प्रकृती खालावली; जरांगे पाटलांना पाठिंबा

महामार्गावरील रस्ता रोको दरम्यान जमावाद्वारे हिंसक कारवाया केल्या जाण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान २७ ऑक्टोबर रोजी उमरखेड जवळ एसटी बस जाळण्यात आली होती. बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे.

कलम काय आहे?

कलम १४४ हे "फौजदारी दंड संहिता १९७३ 3' अंतर्गत येणारे कलम असून हा जमावबंदीचा आदेश असतो. या कलमानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी हा कायदा लागू केला जातो. दंगल, हिंसाचार किंवा दंगलसदृश्‍य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हे कलम लावले जाते. त्या ठिकाणी पोलिसांकडून हे कलम लागू केले जाते. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये ५ किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply