Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, विदर्भात नेत्यांना 'या' गावात करण्यात आली गावबंदी

Maratha Reservation: राहेरी बु. गांव हे आमदार, खासदार, नेत्यांना गावात प्रवेशबंदी करणारे विदर्भातील पहिले गाव ठरले आहे. त्यामुळे त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. तालुक्यातील राहेरी बु. गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकले असून आमदार, खासदार नेते व पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नये, असे फलक लावण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विदर्भामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे राहेरी हे पहिले गांव ठरले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस; विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

तालुक्यातील राहेरी बु. गांवाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून नेत्यांना गावबंदी केल्याने व आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गावबंदीच्या फलकामुळे लोकप्रतिनिधीची कोंडी होणार आहे. गाव जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात नेत्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राहेरी बु. येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

गावातील एक रहिवासी मदन देशमुख यांनी यावेळी सांगितले की, जोवर आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोवर कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना गावामध्ये येऊ देणार नाही, अन्यथा गावांमध्ये आल्यास त्यांचा अपमान करण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. असेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

राहेरी बु. गावच्या प्रवेशद्वारावर गावबंदीचा फलक लावतांना मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. गावबंदीचे लोण विदर्भात सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply