Manoj Jarange Patil: तीनशे बैलगाड्या, शेकडो वाहनं लाखोंचा जनसमूदाय... बीडमध्ये आज मराठ्यांचा एल्गार, वाचा कसं आहे शांतता रॅलीच नियोजन

Maratha Reservation: मराठ्यांची महाशांतता रॅलीचा समारोप १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. या समारोप महाशांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी फुलबी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृत्ती करण्यात येत आहे.

तीनशे बेलगाडीसह वाहनांचा या रॅलीत सहभाग असणार आहे. प्रत्येक गावातून मोठा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. लाखोच्या संख्येने महाशांतता रॅलीत समाज बांधव सहभागी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१०) सांगितले.
फुलंब्री तालुक्यातील गावागावात या जनजागृती अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विविध प्रकारच्या वाहणांसह तीनशे बैलगाडीचे या मराठ्यांच्या महा शांतता रॅलीला जाण्यासाठी नियोजन करण्यात आले असून वडोद बाजार येथून मराठा समाज बांधवाची बुधवार रोजी पहीली बैलगाडीने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली आहे.

Manoj Jarange Patil Rally : संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड 8 ते 9 तास राहणार बंद

13 जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या पाच तारखेपासून गावोगावी जाऊन रॅली सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये दररोज एक जिल्हा परिषद सर्कलची निवड करण्यात आली.

सकाळी ७ ते १० एक पंचायत समिती सर्कल व संध्याकाळी सहा ते नऊ एक पंचायत समिती सर्कल असे जनजागृती अभियानाच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या जनजागृती अभियानास प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून रात्री अकरा वाजेपर्यंत गावागावात बैठका घेण्यात येत आहे.
समाज बांधव स्वखर्चाने सहभागी होणार

मराठ्यांच्या या शांतता रॅलीत स्वखचनि प्रत्येक गावातून किमान 500 महिला व नागरिक जाण्याचे नियोजन करण्यात आले असून सुमारे तालुक्यातून एक लाखाच्या वर मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी होणार आहे. या रॅलीत जाण्यासाठी कुणालाही वैयक्तिक वाहन देण्यात येणार नसून स्वखचनि ज्याला जसे जमेल तसे या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा करत आहेत.

मुस्लिम व दलित समाजाचा पाठिंबा

प्रत्येक गावात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांतता रॅलीसाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विविध गावातील मुस्लिम, दलीत व इतर समाज बांधवांचा या जनजागृती अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. बरेच ठिकाणी मुस्लिम व दलित बांधवानी जाहीर सभेत भाषण करून मनोज जरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply