Maratha Reservation : राज्यभरात मराठा समाजाचा रास्ता रोको; जालन्यात समृद्धी महामार्ग अडवला, वाहतुकीला मोठा फटका

Maratha Reservation : राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. शनिवारपासून (२४ फेब्रुवारी) गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगेंच्या या आवाहनाला राज्यभरातील मराठा समाजाने पाठींबा दिला आहे. 

सकल मराठा समाजाकडून शहरातील हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून एक मराठा लाख मराठा घोषणेने परिसर दणाणला आहे. आंदोलनामुळे संभाजीनगर-जळगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.

Buldhana News : समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना! अपघातानंतर ट्रक पेटला; चालक आणि वाहकाचा होरपळून मृत्यू

बीडमध्ये देखील मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलकांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. लातूरमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिस अधीक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, जालन्यात संतप्त मराठा आंदोलकांनी थेट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग  अडवला आहे.

यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण गावातल्या मराठा समाजाच्या वतीने समृद्धी महामार्गावर आंदोलन सुरू केलं आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान हे आंदोलन सुरू ठेवणार, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यानन, बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहनांना अडवू नका, असं आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं होतं. त्यानुसार, मराठा बांधवांकडून विद्यार्थ्यांच्या वाहनांना रास्ता मोकळा करून देण्यात येत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply