Maratha Reservation मराठा आरक्षणासंदर्भात‘ सगेसोयरे’अधिसूचनेवर ४ लाखांहून अधिक हरकती प्राप्त

Maratha Reservation  : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व्हेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. याच संर्दभात आता ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीत सांगण्यात आलं आहे की, ''सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.'' 

Pune Drug : पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाधड कारवाई; 37 लाखांचे कोकेन, एमडी, गांजा जप्त

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने माहिती दिली आहे की, ''१६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.''

यामध्येच पुढे सांगण्यात आलं आहे की, ''या हरकती व सूचनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग तसेच मध्यवर्ती टपाल नोंदणी शाखा, मंत्रालय, मुंबई या विभागांच्या कार्यालयातील सुमारे 300 हून अधिक अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत 17 फेब्रुवारी ते दि.19 फेब्रुवारी 2024 या सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी कार्यालयात हजर राहून याबाबत प्रक्रिया करण्यात येत आहे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply