पुणे : देशातील सध्याची परिस्थिती व धोरणात्मक पातळीवर काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी तरुण अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे. असे मत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीर मधील सध्याच्या सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने दक्षिण मुख्यालयाच्या कक्षेतील डेझर्ट कोअरच्या वतीने लेफ्टनंट जनरल नैन यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चिनार कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी पी पांडे, लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लों (निवृत्त), जम्मू काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक राजेंद्र कुमार, पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त परराष्ट्रनीतीमधील तज्ञ टी सी राघवन आदींनी सहभाग घेतला होता. या विषयातील जाणकार असलेले आदित्य राज कौल, लेखक ऐजाज वाणी, रजा मुनिब, डॉ. अशोक बेहुरिया आदींनी या संदर्भातील मते मांडले. यावेळी कलम ३७० रद्द केल्यानंतर जागतिक व राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीत झालेला आमूलाग्र बदल आणि त्यामुळे काश्मीरच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवरील परिणाम यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. तसेच भावी वाटचालीबाबत चर्चासत्र झाले.
लेफ्टनंट जनरल नैन म्हणाले, ‘‘काश्मीर येथील युवावर्गाने मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असून त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज आहे. या भागात अंमलीपदार्थाशी संबंधित दहशतवाद रोखणे आणि प्रमुख संस्थांमध्ये घुसखोरी होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कलम ३७० रद्द करणे, राज्य म्हणून जम्मू-काश्मीर संदर्भात टप्प्याटप्प्याने घातलेल्या मर्यादा अशा अनेक निर्णय जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले. दरम्यान अधिक धोरणात्मक निर्णयासाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक परिणामाच्या विश्र्लेषणाची दखल घेतली पाहिजे.’’ पाकिस्तानच्या आगामी धोरणात्मक डावपेचांच्या दृष्टीने आधीच तयार राहण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी तज्ञांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर आधिपत्य मिळवण्यासाठी ‘संपूर्ण राष्ट्र’ या ठोस आणि सयुक्तिक भूमिकेचा अवलंब करण्याच्या गरजेवर भर दिला. या चर्चासत्रात दक्षिण मुख्यालयाच्या ३२ विविध स्टेशनमधून सुमारे ११०० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


