Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी वेळ वाढवून द्यावा.. राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारला विनंती

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या  अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ वाढवून मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे.

 

Dharashiv News : भरधाव टँकरने दोन शाळकरी विद्यार्थिनींना चिरडलं; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील घटना

या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचे यावर शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता आहे. या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री गण उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जरांगेंची प्रकृती खालावली!

दरम्यान, मनोज जरांगे पाटील  यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply