Maratha Reservarion : टायर पेटवून केला रास्ता रोको; धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक

Maratha Reservarion : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन होत असून धाराशिवमध्ये देखील समाज आक्रमक झाला असून कळंब शहराजवळील कळंब- केज रस्त्यावर आंदोलकांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने  आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचा पार्श्वभूमीवर कळंब- केज रस्त्यावरील मांजरा पुलावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी वेळ वाढवून द्यावा.. राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारला विनंती

जोरदार घोषणाबाजी 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. येथे समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरु केले असून रस्त्यावर टायर पेटवुन मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी केली. तर या आंदोलनामुळे कळंब- केज मार्गावरील वाहतुक बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. येथे पोलीस देखील उपस्थित झाले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *