Maratha Andolan : 'सगेसोयरे' अंमलबजावणी व्हावी, धाराशिवमध्ये मराठा समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

Maratha Andolan : 'मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या वतीने आज (मंगळवार) मराठा समाजाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदाेलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  धाराशिव  मध्ये सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले...

सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले सर्व प्रकारचे गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी शेकडो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा धडक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत महिलांसह युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply