Maratha Andolan : शिवनेरीवर येताना आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या; अन्यथा... मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Maratha Andolan :  आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जातंय. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक करीत आहेत. तर २१ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन राज्य सरकारने दिलंय.अशातच १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर येताना मराठा आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जावं लागेल, असा इसारा मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईत जीन्स कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी

पुणे नाशिक महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महामार्गावर एक तासांपासून मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. यावेळी मनोज जरांगेपाटलांच्या आव्हानाचे स्वागत करून आंदोलनातून आंदोलकांनी माघार घेत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला येताना  मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा, अन्यथा मराठा समाज्याच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply