Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे 'एक पाऊल पुढे'; महाराष्ट्रातील लोकसभा, राज्यसभा खासदारांना एकत्र आणणार

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी 'एक पाऊल पुढे' टाकलं आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. तर राज्यात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्या वतीने उपोषण आणि आंदोलने करण्यात आली. मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला अल्टिमेटमही देण्यात आलेले आहे. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे.

Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन; देशभरातून चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर

मराठा आरक्षणासाठी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. ते लवकरच खासदारांची बैठक बोलावणार आहेत. ही बैठक दिल्लीत होणार आहे. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यातील खासदारांनी उचलून धरावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply