Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला सरपंचाचा राजीनामा, मनोज जरांगेंना पाठिंबा

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडू लागले आहेत. अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी महाराष्ट्रातील पहिल्या महिला सरपंचाने राजीनामा दिला आहे. चंचला पाटील असं राजीनामा दिलेल्या माहिला सरपंचाचं नाव आहे.

चंचला पाटील या सोलापूरच्या माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या त्या पहिल्या महिला सरपंच आहेत. राजीनामा देताना चंचला पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

Kolhapur Maratha Protest : कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनात राडा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचं हे राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी बीडच्या केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राजीनामा दिला आहे.थोरात यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदाराची कार जाळल्या, बंगलाही पेटला

मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळूंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगला आग लावली. या आगीत सोळुंके यांच्या कारसह बंगल्याला देखील आग लागली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply