Metro Subway: १०० कोटींचा खर्च, ३०६ मीटर लांबी; मंत्रालय-विधान भवन जोडणारा सबवे पुढच्या वर्षी खुला होणार

Mumbai : नरिमन पॉईंट परिसरात मंत्रालय, विधान भवन आणि अन्य काही प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो ३ स्थानकाशी जोडणाऱ्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. या बोगद्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ३०६ मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरसीएलला आहे.

चर्चगेट-नरिमन पॉईंट या भागात अनेक शासकीय इमारती, जागा आहेत. असंख्य सरकारी कर्मचारी दररोज कामानिमित्त येत असतात. सर्वसामान्यांसह मोठे पदाधिकारी, नेतेमंडळीही या परिसरात येत असतात. परिणामी या भागात गर्दी, वाहतुक कोंडी होत असते. या प्रश्नावर मात करण्यासाठी शासनाने मंत्रालय, विधान भवन यांसारख्या महत्त्वपूर्ण जागांना भूमिगत बोगद्याने जोडण्याचे ठरवले. याचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे देण्यात आले.

Pune : भंगाराच्या गॅरेजमध्ये भीषण स्फोट; एकाच दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय-विधान भवन ते विधान भवन मेट्रो ३ स्थानकाला जोडणारा बोगदा जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. या बोगद्याची लांबी ३०६ मीटर असणार आहे. मंत्रालयाजवळ त्याची रुंदी १६ मीटर, तर इतर ठिकाणी त्याची रुंदी ९ मीटर असणार आहे. महत्त्वाच्या सरकारी इमारतींना जोडणारा हा बोगदा विधान भवन मेट्रो ३ स्थानकाजवळ उघडेल.

मंत्रालय, विधान भवन अशा कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी संवेदनशील होऊ काम करावे लागते. त्याचाही कामावर परिणाम झाला, असे एमएमआरसीएलच्या एल. के. गुप्ता यांनी सांगितले. त्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहितीही दिली. खोदकाम झाले असून मातीचा ढीग बाहेर काढण्याचे आणि बोगदा बांधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. या कामासाठी खास ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान असलेल्या मशिन्सचा वापर केला जात असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply