Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? सकल मराठा समाजानं केली Z प्लस सुरक्षेची मागणी

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झटत असलेल्या मनोज जारांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आलाय. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यापूर्वी काम करणाऱ्या नेत्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्यात. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या जीवालाही धेका असू शकतो अशी भीती मराठा बांधवांनी व्यक्त केलीये.

Savitribai Phule Pune University : PM मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जोरदार राडा; दोन गट भिडले

त्यामुळे त्यांना प्रशासनाने झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. परंतु राज्य सरकारच्या समन्वय समितीने मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केल्यानंतर, सध्या त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं असलं तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा कायम ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी या समन्वय समितीला स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता सकल मराठा समाजाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply