Manoj jarange Patil : '...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा!

Manoj jarange Patil : मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र आज अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असे ते म्हणाले. तसेच उद्या रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Raj Thackeray : गुरुवारपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; म्हणाले, "तयारीला लागा मी येतोय"

काय म्हणाले जरांगे पाटील?

"जोपर्यंत काल काढलेल्या अध्यादेशाची कायदेशीर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध राहावं लागेल. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच शेवटच्या मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. एकाही मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळाले की आंदोलनाचे काय करायचे ते ठरवु," असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे सगे सोयऱ्यांनाही नोंदी मिळाल्यास प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी, नोंद मिळालेल्या सगेसोयऱ्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर खरा गुलाल उधळु, विजय साजरा करु असे जरांगे पाटील  यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  जरांगे पाटील यांनी यावेळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार असल्याचेही सांगितले आहे. २९ जानेवारीला जरांगे पाटील हे रायगडावर जाणार असून ३० जानेवारीला छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन माघारी घरी येईन, असे त्यांनी म्हटले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply