Manoj jarange Patil : 'मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी अन्यथा...' जरांगे पाटलांचा इशारा

Manoj jarange Patil : शनिवारी (१३, जानेवारी) बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोर जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीमागे जरांगे पाटलांचा हात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी या सभेमधून केला होता. या आरोपांवर आता जरांगे पाटील यांनीही सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"भुजबळांना मंत्री पदावरून हटवून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. पिस्तुलाची भाषा बोलून भुजबळ मराठा आंदोलकांना बदनाम करत आहेत.. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी अन्यथा ते दोघेही टारगेटवर असतील," असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Political News : 'मंत्री नारायण राणे वाढत्या वयोमानामुळं लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत'; नीलेश राणे यांची माहिती

नादी लागायच नाही..

"भुजबळ लईच येडे आहेत. कधी शहाणे होतील काय माहिती. पुढच्या वेळी भुजबळ यांना मंत्रीपद देणार नाहीत त्यामुळे गरज नाही असं म्हणतात बोलत आहेत, आता त्यांच्या नादी लागायचं नाही," अशी टीकाही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply