Manoj Jarange Patil : पंतप्रधान नाशिकला आले पण सिंदखेडराजाला आले नाहीत; मोदींवर मनोज जरांगेंची नाराजी

Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते. येथे त्यांनी भव्य रोड शो केला. मोदींनी आरक्षणावर बोलावं काही भूमिका घ्यावी अशी अनेक मराठा बांधवांची इच्छा आहे. मात्र तसे होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींच्या दौऱ्यानंतर माध्यामांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, "पंतप्रधान नाशिकला आले पण सिंदखेड राजाला आले नाहीत. पंतप्रधान मोदी जवळ आले काय आणि लांब गेले काय, सामान्य माणसांची त्यांना आवश्यकता राहिली नाही."

Chhagan Bhujbal : बीडमध्ये आज छगन भुजबळांची तोफ धडाडणार; ओबीसींची महाएल्गार सभा

पण सामान्य काय करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पंतप्रधान यांना सारखं सारखं साद घालायला मराठे एव्हढे लेचेपेचे नाहीत. त्यांच्यात माणुसकी जिवंत राहिली नाही, अशा शब्दांत जरांगेंनी मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *