Manoj Jarange News : माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय, पण जीव गेला तरी माघार नाही; भर सभेत जरांगेंना अश्रू अनावर

Manoj Jarange News :  मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी जीवाची बाजी लावून लढत आहे. त्यामुळे काहीजण मला शत्रू मानायला लागले आहेत. माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय. पण जीव गेला तरी मी माघार घेणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मराठा समाजाची परिस्थिती सांगताना जरांगे भावूक देखील झाले.

नांदेडच्या वाडी पाटी जिजाऊ नगर येथील १११ एकरच्या भव्य मैदानावर आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. 

Kalyan News : काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन; सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात भाजप आक्रमक

याशिवाय मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार, असा विश्वासही व्यक्त केला. मराठा समाज हा शेतीत राबणारा आणि काबाड कष्ट करणारा आहे. पूर्वीपासून आपला समाज या देशाला अन्नपुरवठा करीत आहेत. मात्र, निसर्ग साथ देत नाही. त्यात दुष्काळाचे सावट, त्यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली राहिलेला नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण आहे, हे मी सरकारला सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. त्यामुळे सरकारने कुणबी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. समितीला राज्यभरात कुणबींच्या ३५ लाख नोंदी सापडल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी जीवाची बाजी लावून लढत आहे. त्यामुळे काहीजण मला शत्रू मानायला लागले आहेत. माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय. पण जीव गेला तरी मी माघार घेणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाला  आम्ही आरक्षण देण्यास तत्पर आहोत, असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळेच आपण त्यांना २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. आज दिवसभर अधिवेशनात मराठा आरक्षणाच्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बाजूने कोण उभं राहतं, हे आपण पाहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आमदारांनी अधिवेशनात शांत बसू नये, तुम्ही आज आवाज उठवला तर मराठा समाज तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, जर बाजू मांडली नाही, तर आम्ही तुम्हाला दारात सुद्धा येऊन देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी मराठा नेत्यांना दिला आहे. यावेळी भाषण करताना जरांगेंना अश्रू अनावर झाले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply