Manoj Jarange News : 'मला बोलू द्या, अन्यथा...'; मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ

Manoj Jarange News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यातील विविध भागात सभा घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यानंतर जरांगे यांच्याकडून राज्यभरात दौरे सुरू आहेत. आज त्यांची पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये सभा झाली. या सभेत मनोज जरांगे यांच्या भाषणावेळी एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या कृत्यानंतर स्टेजवर एकच तणाव पाहायला मिळाला. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातील राजगुरुनगर येथे जंगी सभा झाली. या सभेला मराठा समाजातील पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. जरांगे यांची सभा १०० एकरात पार पडली. या जंगी सभेत एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 

Devendra Fadnavis : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ठाकरे गटावर गंभीर केले आरोप

नेमकं काय घडलं?

जरांगे यांच्या भाषणावेळी अचानक एक तरुण स्टेजवर आला. हा तरुण माईक हातात घेऊन आल्यानंतर मला बोलू द्या म्हणू लागला. मला बोलू दिले नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील तरुणाने दिली.

स्टेजवरील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढत बाजूला नेले. त्यानंतर स्टेजवर तरुण आणि जरांगे पाटील यांचा संवाद झाला. खुद्द जरांगे यांनीही त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मनोज जरांगे भाषणात काय म्हणाले?

आजच्या पुण्यातील सभेत जरांगे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा आंदोलकांच्या आत्महत्यांना फक्त सरकारच जबाबदार आहे. सरकारने वेळेत आरक्षण दिले असतं तर या आत्महत्या झाल्या नसत्या, असंही जरांगे म्हणाले. या सरकारने २४ तारखेपंर्यत कोणालाच काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे.

'मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता शांत राहायचं. २४ तारखेपर्यंत कोणालाच उत्तर द्यायचं नाही. मराठा आरक्षणावरून वातावरण दूषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply