Manish Sisodia : सिसोदिया प्रामाणिक व्यक्ती, पण...; BJPच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील दोन मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. दारू घोटाळ्यावरून सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांनी सिसोदियांच्या अटकेवर म्हटलं की, ते प्रामाणिक नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचं सांगत त्यांनी कौतुक केलं आहे. मात्र ते आज कारागृहात बंद असून दोन्ही बाजुने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र कोणत्याही कारणाशिवाय सीबीआय त्यांना कारागृहात टाकेल, असं होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

शांता कुमार म्हणाले की, सिसोदिया यांचं शिक्षण क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. तरी देखील ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले. यातून एकच निष्कर्ष निघतो की, भ्रष्टाचार किती खोलवर गेला आहे. प्रामाणिकपणाच्या स्टेशनवरून निघालेली प्रत्येक गडी भ्रष्टाचाराच्या स्टेशनवर पोहोचत असल्याचंही कुमार यांनी नमूद केलं . दरम्यान सिसोदिया हे प्रामाणिक आहेत. मात्र पक्ष आणि निवडणुका लढविण्यासाठी त्यांनी संपत्ती जमा केली असावी, असा दावाही शांता कुमार यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply