Manipur Violence : मणिपूरमध्ये ४० दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

नवी दिल्लीः मणिपूरमध्ये हिंसा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज पुन्हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इंफाल घाटी आणि आसपासच्या परिसरात पाच ठिकाणी एकसोबतच हल्ला केला.

मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणाले की, आतापर्यंत राज्यामध्ये ४० दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे. सोबतच काही दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई दहशतवादी समूहांच्या प्रत्युत्तरादाखल असून स्वसंरक्षणासाठी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री सीएम एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या दहशतवादी समूहाविरोधात कारवाई करण्यात आली आहे ते लोक अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले करत होते. ते नागरिकांवर एम-१६ आणि एके-४७ असोल्ट रायफल आणि स्नाइपर गनचा वापर करत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दहशतवादी समूहाचे लोक अनेक गावांमध्ये घुसून घरं जाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सेना आणि अन्य सुरक्षा दलांनी फायरिंग सुरु केली. दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चकमकी दोन समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहेत. मणिपूरमध्ये हिंसा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply