Maharashtra Weather Update : रात्री गारठा, दिवसा उकाडा! पुढील ५ दिवसा तापमानाचा अंदाज काय?

Mumbai, Maharashtra Weather Update Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. पहाटेच्या वेळी थंडीत गारवा असल्याचे दिसतेय. उत्तर महाराष्ट्राचा पारा १० अंशाच्या खाली घसरलाय. पण दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी थंडी कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवतेय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पहाटे थंडी आणि दिवसा कडक ऊन असे राज्यात सध्या वातावारण आहे, पुढील पाच दिवस राज्यात असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रात आकाश मुख्यतः निरभ्र राहून, किमान तापमानातील घट टिकून राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानात चढउतार होऊ शकतो, त्यामुळे राज्यात थंडी कमी-अधिक जाणवू शकते. राज्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक थंडी आहे. नाशिक, निफाड अन् धुळ्यातील तापमानाचा पारा घसरलाय.

 

वायव्य उत्तर प्रदेशापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. पश्चिमी चक्रावातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. १९) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Shahapur Police : आसनगावजवळ ६ किलो गांजा जप्त; शहापूर पोलिसांकडून एकजण ताब्यात

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे, दुसरीकडे धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याने राज्याचा किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर सरकला आहे. किमान तापमानात वाढ झाली असतानाच उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा तसेच कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंशाच्या खाली घसरलेय.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात पुढील तीन ते चार दिवस कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कमान आणि किमान तापमान जसं आहे, तसेच राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही पुढील पाच दिवस तापमान जास्त बदलणार नाही, दोन ते तीन डिग्री तापमानात चढ उतार पाहायला मिळू शकतो. राज्यात पुढील पाच दिवस कोरडे तापमान राहण्याची शक्यता आहे, त्यामध्ये थंडी कमी जास्त होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply