Maharashtra Weather Forecast : मुंबई आणि उपनगरात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast : पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागानुसार पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. गणेश चतुर्थीनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. जर हा अंदाज खरा ठरला तर खरीप पिकांना याचा फायदा होईल. पुढील पाच दिवस मु्ंबई आणि उपनगरात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईच्या हवामानात मोठा बदल झालाय. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईत ढगाळ वातावरण तयार झालं असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. 

Ahmednagar Crime News : सशस्त्र दरोडा टाकत एकाची निर्घृण हत्या; महिलेला मारहाण करत केले गंभीर जखमी

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यामधील काही भागात पावसाचा जोर तीव्र होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय. दरम्यान हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला नाही. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस झाला आहे. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाणेसह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पाऊस होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply