Maharashtra Weather : धडकी भरवणारा पाऊस कोसळणार, रायगडला रेड अलर्ट, पुणे-मुंबईतही धो धो कोसळणार

IMD issues red alert for Raigad as heavy rains lash Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात आज अतितीव्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात येलो अलर्ट असून, सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मंगळवार-बुधवारी मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भात सोमवार ते गुरुवार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या जोरामुळे कोकणात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला असून, प्रशासनाने सावधगिरीचे आवाहन केले आहे. नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवले जात आहे. शेतीसाठी हा पाऊस लाभदायक ठरत असला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Mawal Tragedy : हृदयद्रावक !'फादर्स डे'लाच मृत्यूने गाठलं; इंद्रायणीत बाप-लेक बुडाले

रायगडमधील मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलनाचा धोका वाढला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोकणातील नद्या, धरणांचे पाणीपातळीवरही लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आलाय, ते पाहूयात...

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा,

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *