Maharashtra Weather : राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता; पुणे, मुंबई, ठाणे, पालघरवर अवकाळीचं संकट कायम

Maharashtra Weather : मुंबई, ठाणे, पालघरवर आजही अवकाळीचं संकट कायम आहे. राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाडा काहीसा कमी झाला आहे. आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम  आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

१३ मे रोजी सकाळच्या २४ तासांमध्ये अमरावती, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान ढगाळ आकाशामुळे उन्हाचा ताप कमी झाली आहे. कमाल तापमानात काहीशी घट जाणवत आहे. अमरावतीत उच्चांकी म्हणजेच ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले, निकालापूर्वीच सेलिब्रेशन सुरु

पुणे शहरात आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसापासून संध्याकाळच्या सुमारास पुणे शहरात पाऊस पडत आहे. आज दिवसभर कडक ऊन तर संध्याकाळी पावसाचा अंदाज सांगितला आहे.

रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, मुंबईसाठी उष्ण लाटेचा

 पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कर्नाटकमध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत चक्राकार वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आज राज्यामध्ये वादळी  वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम सांगण्यात आला आहे. तर उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबईमध्ये उष्ण लाट, उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply