Maharashtra Election Results : राष्ट्रवादी- शिवसेना फूट भाजपच्याच पथ्यावर, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Maharashtra Election Results : विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्राने न भूतो न भविष्यति असं यश दिलेय. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपने तब्बल १३२ जागा जिंकल्यात. महायुतीमध्ये आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. महाराष्ट्र भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतकं मोठं यश मिळाले असेल. २०१४ मध्ये मोदींच्या लाटेतही भाजपला इतकं अभूतपूर्व यश मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. आता एकटा भाजप १३२ जागांपर्यंत पोहचलाय.

भाजपच्या या अभुतपूर्व विजयात देवेंद्र फडणवीस यांचं योगदान नाकारता येणार नाही. महायुतीचं दोन दिवसांत सरकार स्थापन केलं जाणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा झाला का? काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे का? यासारखी राजकीय चर्चा सुरू आहे.

Sharad Pawar : पवारांचा गड भेदला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश; साखर पट्ट्यात 'तुतारी'ची पिछेहाट

२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण ३६० डिग्रीमध्ये बदलले. ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, त्यानंतर फडणवीस यांनी पहाटेच अजितदादांसोबत सूर जुळवले. पण खूप काळ हे टिकलं नाही. राज्यात मविआच्या सरकारचा जन्म झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. त्यांनी सत्तास्थापन करत भाजपला जोरदार धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांना मुखमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. ही सल कायम त्यांच्या मनात राहिली. पण २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ मध्ये एकसंध राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले.

मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि एकसंध शिवसेना यांचं फाटलं. ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेत महाराष्ट्राला आणखी एक धक्का दिला. पण दोन-अडीच वर्षात ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदें यांच्या बंडामुळे ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमगारांना सोबत जात गुनाहाटी गाठली. मविआचे सरकार कोसळलं, अन् एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रि‍पदाची माळ पडली. शिवसेनेत उभी फूट लढली. शिवसेना कुणाची याचा सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply