Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीने दाणादाण; राज्यात अवकाळीने दाणादाण

Rain Update: एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 48 तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी,विलेपार्ला,जोगेश्वरी गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला असताना मुंबई उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. तर उपनगरातील अन्य भागात ढगाळ वातावरण असल्याचे देखील पाहायला मिलात आहे.

सोलापुरात अवकाळी पावसामुळे घरावर वीज कोसळली

सोलापूर शहर आणि परिसरात काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं. शहरातील वसंतविहारमधील अभिमानश्री सोसायटीत वाघचौरे यांच्या घरावर विज कोसळल्यानं घरातील काचा फुटल्या, विजेचे वायरिंग जळाले, शिवाय शेजारील तीन घरांचे नुकसान झाल. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आठवडाभरामध्ये मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातलाय. या गारपिटीमध्ये १० बळी गेलेत तर १४७ जनावरे, ११७८ कोंबड्या दगावल्यात. १५३ गावांत नुकसान झालंय तर आठ हजार हेक्टरवरील पीक-फळबागांना फटका बसलाय. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून मराठवाड्यात गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या आठवाड्यात तर कहर झालाय. 

धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजारी लावली आहे. कळंब, उमरगा, वाशी, तुळजापूर सह धाराशिव मध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने फळबागांचं मोठ नुकसान केला आहे. ज्वारीची कणसे भिजल्यामुळे काळी पडली आहेत. तर कडब्याचंही मोठं नुकसान झालं आहे.

शेतांच्या शिवारामध्ये पाणी साठल्याचे चित्र आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळबागाही उखडून पडल्या आहेत तर वीज कोसळून दोन शेतकरी व 15 जनावरे दगावली आहेत .आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लासलगाव टाकळी विंचूर येथिल कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय पवार यांनी शेड मध्ये ५०० क्विंटल कांदा साठवून ठेवला असतांना वादळी वाऱ्यामुळे त्यांचे शेड कोसळले शिवाय पावसामुळे कांदा काही प्रमाणात भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply