Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; लोकसभेच्या निकालानंतर भाजपची रणनीती काय?

Maharashtra Result 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर महायुतीला फक्त १७ जागा जिंकता आल्यात. भाजपने लोकसभेमध्ये ४०० पारचा नारा दिला होता. मात्र एनडीएच्या विजयाचा झंझावात २९६ जागांवरच थांबला. ही आकडेवारी सत्तास्थापनेसाठी पुरेशी असली तरी स्थिर सरकार राहण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे भाजपने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळालीये.

इंडिया आघाडीने देशात २३१ जागांवर नाव कोरलंय तर एनडीएने २९६ जागांवर विजय मिळवलाय. असं असलं तरी राज्यात मात्र महायुती मागे पडल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या फक्त १७ जागा आल्यात त्यामुळे राज्यात महायुतीचा पराभव झाल्याचं दिसत आहे. राज्यात पराभव झाला तरी केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
 

केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची देखील शक्यता आहे. आज भाजपच्या काही अंतर्गत बैठका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार अशी माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंचा दणदणीत विजय झालाय. त्यामुळे भूमरे यांच्या खात्यावर शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांचा डोळा असल्याचं म्हटलं जातंय. महायुतीच्या सरकारमध्ये राज्यात भुमरेंकडे रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे खाते आहेत.

नितीश कुमार यांच्या JDU पक्षाचे १२ खासदार निवडून आले आहेत. तर चंद्राबाबू यांच्या TDP पक्षाचे १७ खासदार निवडून आले आहेत. त्यांच्या पक्षाची NDA मध्ये महत्वाची भूमिका आहे. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नसल्याने भाजप सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांवर अवलंबून असल्याचं दिसत आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply