Maharashtra Rain Update : पुणे,नाशिकसह अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस; गोदावरी नदीला पूर, जाणून घ्या राज्यातील स्थिती

Maharashtra Rain Update : सकाळपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. नाशिक शहरात सुरू आलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. हवामनाच्या अंदाजानुसार, वरुणराजा धो-धो बरसलाय.

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. धरणांच्या पाणी पातळतीही मोठी वाढ झालीय. खडकवासला धरणातूनही २३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. यामुळे पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय.

Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून वेगाने विसर्ग सुरू, पुलाची वाडी परिसरात पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. धरणांच्या पाणी पातळतीही मोठी वाढ झालीय. खडकवासला धरणातूनही २३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. यामुळे पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेलाय.

भारतीय हवामान खात्यातील हवामानतज्ञ के एस. होसाळीकर यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. हवामान विभागानुसार, आज राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता.

नाशिक जिल्ह्यातील दमदार पाऊस झाला. धरण उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर भागात दिवसभर अतिजोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 106 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलीय. यामुळे अंजनेरी गडावरून असे पाण्याचे लोंढे वाहू लागलेत. तर गंगापूर धरणातून 7000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलाय. पुरामुळे गोदा घाटावरचे छोटे-मोठे मंदिर गेले पाण्याखाली गेलेत. पावसाचा जोर कायम राहिलास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने गोदावरी नदीत वाढवणार पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून 6870 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास चणकापूर धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना मालेगाव पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय. याकाळात कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. पुण्यातील पेठांच्या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय.

नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झालेत. अंकलेश्वर ब्रहानपूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहणारी वरखेडी नदी धोक्याची पातळी ओलांडली असून दुथडी भरून वाहत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस होत असल्याने देवगोई घाटात दरड कोसळलीय. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात कोसळली दरड कोसळलीय.

बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात मुसळधार पाऊस झालाय. आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदी काठच्या गावांचा संपर्क तुटला. चांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मांडेगाव, देवळाली, आरसोली गावांचा संपर्क तुटला,गावाकऱ्यांची झाली गैरसोय झालीय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोरच्या अंजनासागर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. आज दिवसभर मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पूर आलाय. यामुळे पळशी व देवपुळ गावाजवळील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला होता. तीन दिवसांच्या जोरदार पावसाने पावसाची तूट भरून निघाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply