Maharashtra Rain Update : बाप्पाच्या विसर्जनाला 'वरुणराजा'ची हजेरी; मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस,

Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेशभक्तांकडून लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात येत आहे. राज्यातील जवळपास सर्वच गणेश मंडळाच्या थाटामाटात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत भरदुपारीच अंधार पाहायला मिळाला. 

मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव या भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Pune Ganesh Visarjan : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; तब्बल 9 तासांहून अधिक काळ लागला वेळ

राज्यात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीत असलेल्या भाविकांमध्ये पावसातही उत्साह पाहायला मिळत आहे. या पावसातही गणेश विसर्जन पाहण्यसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुणे या शहरांसह कोल्हापूर आणि लातूरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात आज सायंकाळी विजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस बरसला आहे. तर या पावसातही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत तर शहरातील सखल भागात पावसाचं पाणी साचलं होतं. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. तत्पूर्वी, हवामान खात्याने मुंबईसह मुंबईसह उपनगरांना पुढील ४ तास महत्वाचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply