Maharashtra Rain Update : ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर ८ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट, राज्यभरात कशी असेल स्थिती?

Maharashtra Rain Update : उत्तर कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित कोकणासह नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

आज घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

मुंबई-पुण्याला यलो अलर्ट

पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुण्यासह आठ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्हांमध्ये जोरदर पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, जेथे पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply