Maharashtra Rain Update : जुलै महिन्याच्या सुरूवातीला 'वरुणराजा' बरसणार; पहिल्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा...

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह पुण्यामध्येही गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. हाच जोर कायम राहणार असून जुलै महिन्याची सुरूवातही पावसानेच होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जून महिन्यात राज्यासह संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला. आठवडाभरापासून मुंबई, पुणे,नाशिकसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अद्याप राज्यातील काही भागांत पावसाने म्हणावा तसा जोर धरला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.

जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आज पावसाचा अंदाज आहे.

Weather Update : मुंबईसह उपनगरांना अतिवृष्टीचा इशारा; पुढचे २ दिवस महत्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामध्ये सरासरी ९४ ते १०६ टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं आहे. दरम्यान, पहिल्याच पावसानंतर आता कृषी केंद्रांवरही खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी शेतक-यांची गर्दी दिसून येतेय. मात्र काही भागात पाऊस कमी झाल्याने बळीराजा अद्याप चिंतेत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply