Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Updates: राज्यात पूर्णपणे मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे. मात्र, आता मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात येणाऱ्या मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जात आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात येत्या १९ ते २२ जुलै रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांना अर्थ अन् मुंडे कृषिमंत्री, भाजप-शिंदे गटाच्या या मंत्र्यांना बसला मोठा फटका! पहा खातेवाटपाची संपूर्ण यादी

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार पुनरागमन केलं. कोकणातही शुक्रवारी सकाळपासून मुसळघधार पाऊस झाला. आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात दमदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply