Maharashtra Rain Alert : पुढील २४ तास धोक्याचे! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Rain Alert: : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. गुरूवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून बळीराजा सुखावला आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज म्हणजेच शुक्रवारी राज्यातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

आज राज्यातील ७ जिल्ह्यांमध्येऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट

सध्या मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. ठाण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पुण्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अशातच मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात मात्र आज पावसाच्या सरी कोसळणार नसल्याचा अंदाज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply