Maharashtra Politics News : अजित पवारांसह राष्ट्रवादी आणि राजकीय नाट्याचा आजच फैसला?; एका घडामोडीनं सत्तापालटाच्या चर्चांना उधाण

Maharashtra Politics News :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. स्वतः शरद पवार, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी, राज्यात लक्षवेधी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची मोठी घडामोड म्हणजे जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ जपानला गेले होते. ज्यामध्ये राहुल नार्वेकरही होते. हा अभ्यास दौरा 11 ते 21 एप्रिलपर्यंत नियोजित होता. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज तातडीने परत मुंबईमध्ये येत आहेत. राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दौरा अर्धवट सोडून राहुल नार्वेकर मुंबईकडे येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया...

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना शरद पवार यांनी "ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही," असे स्पष्टिकरण दिले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी....

तर दुसरीकडे "अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली असल्याचे मोठे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल," असेही ते म्हणाले आहेत. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply