Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काॅग्रेसला धाराशिवमध्ये खिंडार! १२ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश;

Dharashiv News: छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली. या सभेतून बोलताना उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र या सभेच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव येथील एकूण १७ पैकी ११ नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव मधील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, सौ. सुवर्णा सागर मुंडे, सौ. आशा सुधीर भवर यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष सुर्यभान पवार, इंदुमती हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, गीता महेश पुरी, सफुरा शकील काझी या माजी उपनगराध्यक्ष यांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण मनोहर कापसे ( माजी गटनेता ), सुधीर मुरलीधर भवर (सरचिटणीस कळंब शहर ) महेश मिठू पुरी ( कार्याध्यक्ष ), उत्रेश्वर बळीराम चोंदे ( उपाध्यक्ष ), माजी नगरसेवक मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, कांतीलाल मोहनलाल बागरेचा यांचा समावेश आहे. या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कळंब नगरपालिकेवर फडकेल, असा विश्वास कळंबचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी व्यक्त केला आहे. तर काल ठाकरे गटाचे तर आज राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत आले आहेत, त्यांच्याकडे काय उरले आहे? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply