Maharashtra Politics : ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली


Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाला एकापोठापाठ एक धक्के बसत आहेत. सांगली पाठोपाठ आता पुणे आणि अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली असून लवकच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा ठाकरेंना मोठा धक्का असून आता शिंदेसेनेची ताकद आणखी वाढणार आहेत.

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. आज संध्याकाळी मुंबईत हे सर्वजण धनुष्यबाण हाती घेणार आहेत. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आश्विनी मल्हारे, प्रतीक्षा महाले, भक्ती जगदाळे, सुप्रिया खेडकर, समीरा प्रधान, दिपाली पोटे, नूतन शरद दिवार आणि वैजयंती फाटे हे सर्वजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Sasoon Hospital https://punenews24.in/latest-news/sasoon-hospital-2/

तर दुसरीकडे, अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मुंबई येथे संदेश कार्ले हे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर विधानसभेसाठी तिकीट मागितले होते मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यामुळे ते नाराज होते.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाचे २४ नगरसेवक असताना तिकीट श्रीगोंदा मतदारसंघात दिले. त्यामुळे संदेश कार्ले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील भेटायला वेळ देत नसल्याने संदेश कार्ले यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पक्ष प्रवेशासाठी आज शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply